◾कविता :- नवरा माझा
नवरा माझा
पहिले होता कुंकवाचा धनी,
आता मात्र, तो आहे फक्त......
माझ्यासाठी ब्लॅक अँण्ड व्हाइट मनी,
पहिले होता तो,
माझ्या घराचा पहारेकरी,
आता मात्र, आहे नुसताच तो...
माझ्या प्रेमाचा वाटेकरी,
त्याच्यामुळे बसली
आमच्या विस्कटलेल्या संसाराची घडी,
आता मात्र, नुसताच आहे तो...
माझ्यासाठी एक 'घरगडी',
पहिले होता तो माझ्यासाठी,
संकटी धावुन येणारा 'देव',
आता मात्र, वाटतो मला तो...
नको-नकोशी वाटणारी 'ठेव',
म्हणायचे पहिले मी,
त्याला आदराने 'पंत',
आता मात्र, तो झाला...
माझ्या सहनशिलतेचा अंत,
पहिले होता,
नवरा माझा भोळा,
आता मात्र, वाटतो तो मला...
संसारी माझ्या,
आकार-उकार नसलेला
फक्त एक... मातीचा 'गोळा',
मंगेश शिवलाल बरंई.
पंचवटी, नाशिक ४२२००३.
Nice your Think .
ReplyDelete