◼️ ललित लेख :- आयुष्यात शनीची साडेसाती गरजेची...

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄ साडेसाती भोगलेली माणसं ही नंतर नक्कीच यशस्वी होतात. संगीत क्षेत्र नाट्यक्षेत्र, खेळाडू क्षेत्र, यामध्ये यश साडेसाती मध्ये मिळालेली आहे. (पंडित भीमसेन जोशी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकरने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केले, यां सर्वांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाले साडेसाती मध्येच. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी साडेसाती मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले. चटका बसलेला माणूस ताकही फुंकून पितो, म्हणजे येणाऱ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट सावधानपणे केली पाहिजे याची जाणीव साडेसातीच करून देते. खरं कोण खोटं कोण याचा उलगडा करते. साडेसाती मध्ये होणारे आघात हे माणसाचे मन बळकट करतात. म्हणूनच माणूस चांगल्या काळात येणाऱ्या बारीक-सारीक संकटांना तोंड देऊ शकतो. या जगात बरेच सक्सेसफुल माणसे म्हणतात, मला या जगाने खूप काही शिकवले, ते फक्त साडेसाती मुळेच असते. मन सशक्त करते आणी संकटांना न घाबरण्याची बळही साडेसाती देते. साडेसाती माणसाला कष्टावर विश्वास ठेवायला शिकवते ना की नशीबावर. साडेसाती माणसाला प्रपंचातील इतर माणसांची लबाडी ओळखायला शिकवते. ता...