Posts

Showing posts with the label जे असेल त्यात समाधान मानावे - बोधकथा

जे असेल त्यात समाधान मानावे - बोधकथा

एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो  कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का?    तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्‍वराने या जगात  प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा  उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न  देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'   तात्पर्य:- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.