बोधकथा :- प्रारब्ध आणि संगत
माणसाची ओळख ही त्याच्या संगती वरून ठरते. तुम्ही दोन पोपटाची गोष्ट वाचलीच असेल. एक चोरा जवळ राहतो आणि एक साधू जवळ दोघांच्यात झालेला बदल तुम्हाला माहित आहेच ! ... खाली असाच एक लेख आहे ... 💐🌸💐 एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, " अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस तर उदया तू माझ्या घरी जेवायला ये." भुंगा दुस-या दिवशी तडक त्याच्याकडे गेला पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उदया माझ्याकडे ये!.. दुस-याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्याने परागरस चाखला.किती भाग्यवान मी!...अस म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या देवाच्या चरणांवर अर्पण केलं. किड्याला भगवानाचे दर्शन झालं तो धन्य झाला कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं ...