जिवन विचार - 31
*' संता नाही जाती शिंपल्यापोटी जन्मे मोती. '* 🙏🙏 *सज्जन म्हणजे थोर पुरुष.सज्जन या पृथ्वीतलावर🌎 उमललेल्या फुलाप्रमाणं 🌺 सर्वत्र आपल्या सद्गुणांचा सुगंध पसरवित असतात.परोपकारासाठीच त्याचा जन्म असतो.नम्रता हाच सज्जनाचा मुख्य अलंकार असतो.सज्जनाच्या ठायी दया , क्षमा आणि शांती सतत वास करीत असते.* *सज्जन हे कोणा एका जातीचे किंवा धर्माचे नसतात.ते सर्वांचे सारखे असतात.🌞सूर्य जसा सर्वांना प्रकाश देतो त्याप्रमाणं सज्जन सर्वांच्यावर प्रेमाचा पाऊस पाडतात. ' चंद्र आणि चांदण्यापेक्षाही शितल असतो सज्जनांचा सहवास'. आणि अशा सज्जनांचा सहवास लाभला तर माणसाच्या जीवनाचं सोनं होत.*