जाणून घ्या महाराजांचा अंगरक्षक जिवा महाला विषयी - biography /जिवनी
जिवा महाला जिवा महाला हा प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी राजांचे प्राण वाचवणारा वीर होता. जिवाजी महाला हे श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांचे अंगरक्षक होते, त्याने प्रतापगडाच्या लढाईत श्रीमंत छत्रपती शिवाजीं महाराजांना वाचवले होते. जिवाचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत. वंशावळ – जिवा महालाचा मोठा भाऊ हा ताना (तानाजी) महाले असावा. जिवा महालाचा मुलगा सीताराम; सीतारामचा मुलगा (सुभानजी); सुभानजीचे (नवलोजी व काळोजी); नवलोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानी होय. हरी आणि सुभानजी हे जिवा महालाचे खापरपणतू होतात. जिवा महाला यांचे वडील पहिलवान होते, त्यांनीच जिवा महाला यांना पहिलवानीचे धडे दिले ...