जाणून घ्या महाराजांचा अंगरक्षक जिवा महाला विषयी - biography /जिवनी

जिवा महाला 


जिवा महाला हा प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी राजांचे प्राण वाचवणारा वीर होता. 

​जिवाजी महाला हे श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांचे अंगरक्षक होते, त्याने प्रतापगडाच्या लढाईत श्रीमंत छत्रपती शिवाजीं महाराजांना वाचवले होते.
                  जिवाचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत.
               वंशावळ – जिवा महालाचा मोठा भाऊ हा ताना (तानाजी) महाले असावा. जिवा महालाचा मुलगा सीताराम; सीतारामचा मुलगा (सुभानजी); सुभानजीचे (नवलोजी व काळोजी); नवलोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानी होय.

हरी आणि सुभानजी हे जिवा महालाचे खापरपणतू होतात.

जिवा महाला यांचे वडील पहिलवान होते, त्यांनीच जिवा महाला यांना पहिलवानीचे धडे दिले होते. जिवाचे वडील शिवाजी राजांचे वडील शहाजी यांच्या सेवेत होते. युद्धसमयी त्यांना एक पाय गमवावा लागला होता.
                शिवाजी राज्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाने सय्यद बंडाशी दोन हात करून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. या प्रसंगी जिवा महालाचे वय २५च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला सरदार श्रीमंत श्री वीर कान्होजी जेधे यांच्या जहागीर आंबवडे गावी, वीर कान्होजी जेधे यांच्या समाधी स्थळाच्या बाजूलाच जिवा महाला यांची समाधी आहे.

दांडपट्टा चालविण्यात महाले समुदाय हा पटाईत होता. आजही महाले समुदायातील म्हातारे लोक दांडपट्टा चालवतात. जिवा महाला सुद्धा दांडपट्टा चालवण्यात तरबेज होता. सैयद बंडाने महाराजांवर तलवार उगारली तेव्हाच दांडपट्टा काढून जिवा महालाने त्याला पालथा पाडला होते, "होता जिवा म्हणून वाचला शिवा’, ही म्हण या प्रसंगावरून पडली.
              छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे/साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. 


*🔹 गाव
जिवाचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत. 
*🔹 घराणे
जिवा महाले आणि शिवा काशीद हे दोघेही न्हावी समाजातील होते.माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवचीपोस्ट 
वंशावळ – जिवा महालेचा मोठा भाऊ 
हा तान (तानाजी) महाले असावा. जिवा महालेचा मुलगा सीताराम; सीतारामचा मुलगा (सुभानजी); सुभानजीचे (नवलोजी व काळोजी); नवलोजीचा मुलगा हरी आणि 
काळोजीचा मुलगा सुभानी होय.. 
हरी आणि सुभानजी हे जिवा महालेचे खापरपणतू होतात. 
🔹 पराक्रम 
शिवाजी महाराजानी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास 
मारल्यावर अफझलखानाच्या 'सय्यद बंडा' नावाच्या रक्षकाने शिवाजीराजेवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. 
परंतु जिवा महाल्याने मध्ये पडून तो वार झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. या प्रसंगी जिवा महालेचे 
वय २५च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. 
*‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’,*  ही म्हण या प्रसंगावरून पडली. 
🔹 छत्रपतींकडून बक्षीस 
छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना 
निगडे/साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात 
जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा 
गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. 
📖 पुस्तक 
जिवा महाला (लेखक - सदाभाऊ खोत; स्वाभिमान 
विचार प्रकाशन--कोल्हापूर) 
🔹 रस्ता 
मुंबईत अंधेरी (पूर्व) येथील ना.सी. फडके रस्ता आणि स्वामी रस्ता यांना जोडणार्या एका छोट्या रस्त्याला जिवा 
महाले रोड म्हणतात. 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !