◾जीवन परिचय :- राम गणेश गडकरी

 प्रसिध्द साहित्यिकांचा परिचय देणारा संकलनात्मक लेख

              राम गणेश गडकरी            

      राम गणेश गडकरी हे मराठीचे नाटककार , कवी आणि विनोदी लेखक होते . त्याचे तीन टोपण नाव होते . गोविंदाग्रज , बाळकराम आणि सवाई नाटकी . त्यांचा जन्म २६ मे १८८५ ला गणदेवी , जिल्हा नवसारी , गुजरात येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव गणेश वासूदेव गडकरी व आईचे नाव सरस्वतीबाई गणेश गडकरी होते . त्याना दोन भार्या होत्या पैकी प्रथम सीताबाई व दुसरी रमाबाई . ते भारतीय होते . त्यांनी कविता , नाटके व विनोदी कथा लिहिलेल्या आहेत . त्यांचे प्रसिध्द साहित्यामध्ये नाटके फार प्रसिध्द झालीत . "एकच प्याला", "प्रेमसन्यास" , “पुण्यप्रभाव" , "भावबंधान" या नाटकांना प्रेक्षकांनी आपली चांगली पसंती दिली आहे . 


     गोविंदाग्रज या टोपण नावाने राम गणेश गडकरी यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या . आणि बाळकराम हया टोपण नावाने काही विनोदी लेख लिहिले . हया साहित्याच्या जोडीला त्यांच्या दोन अपुरी राहिलेली नाटके होती ती “राजसन्यास" आणि  "वेड्यांचा बाजार" .  राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर समजले जाते . विविध नाट्यप्रेमी संस्थानी , राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारासाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत . नागपूरला "राम गणेश गडकरी"  या नावाचा एक साखर कारखाना सुध्दा आहे . 


     वयाच्या आठव्या वर्षीच राम गणेश गडकरी यांचे वडील निवर्तले . वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला . या कौटुबिक धक्यातून सावरताना गडकरीचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले . राम गणेश गडकन्याचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इग्लिंश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले . महाविद्यालयात शिकत असतांनाच मित्रांच्या ओळखीने राम गडकरी "किर्लोस्कर नाटक मंडळीत" दाखल झाले या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या "रंगभूमी" नावाच्या मासिकातून तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या "काळ" या वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्याच्या "करमणूक" या नियतकालिकातून ते कविता , लेख लिहू लागले . कविता व लेखासोबतच ते नाट्यलेखनही करू लागले . 


     राम गणेश गडकन्यांनी आपल्या नाटकाची नावे ही पाच अक्षरीतच ठेवली होती . त्याचा नाटकांचा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय बनलेला आहे . भावबंधन , एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते . आजही महाराष्ट्रात ज्या नाटक मंडळी आहेत त्यांना राम गणेश गडकरी यांच्या नाटके दाखवायला खूप आवडतात व प्रेक्षक सुध्दा त्यांना चांगलीच दाद देतात . त्यांच्या अशा नाटकांसाठीच त्यांना मराठीचे  "शेक्सपियर" असा त्यांचा सार्थ उल्लेख केला जातो . ज्या पध्दतीने त्यांच्या नाटकांना प्रसिध्दी मिळाली आहे त्याचप्रकारे त्यांच्या नाटकातील पात्रानांही प्रसिध्दी मिळाली आहे . उदा . सुधाकर , सिंधू , तळीराम , घनश्याम , लतिका ही पात्रे आजही अजरामर झालेली आहेत . काळ बदलला तरी राम गणेश गडकऱ्यांचे हाताळलेले दारुबंदीसारखे विषयही कालबाहय झाले . 


     पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा त्यांच्या लेखणीलाच द्यायला हवे .  


     "वाग्वैजयंती" हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह आहे . त्यांच्या या काव्यसंग्रहात मुक्तछंदापासून ते छंदबध्द कवितेपर्यंत आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढया दीर्घकवितापर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत . कविता लेखनासाठी गडकन्यांनी गोविंदाग्रज टोपण नाव घेतले होते . 


     नाटके , काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकाराच्या बाहेर जाऊन लहान मुलांसाठी जेमतेम दहा पानांचे पुस्तक लिहिले आहे ते फक्त बालकांसाठी . त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत . या पुस्तकाच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे आहे की , गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या हया लिखाणात येऊ दिले नाही . या शिवाय त्यांनी काही स्फुट लेखनही केलेले आहे . 


=======================

महेन्द्र सोनेवाने

गोंदिया

दिनांक : २५/०५/२०२१

=======================



Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !