◼️ कविता :- मी कुणाला कळलो नाही | ✍️सुरेश भट ...


मी कुणाला कळलो नाही
       ---------------------------------------

मित्र कोण आणि शत्रू कोण
         गणित साधे कळले नाही..
नाही भेटला कोण असा
        ज्याने मला छळले नाही...
सुगंध सारा वाटीत गेलो
          मी कधीच दरवळलो नाही..
ऋतू नाही असा कोणता
           ज्यात मी होरपळलो नाही..
केला सामना वादळाशी
        त्याच्या पासून पळालो नाही..
सामोरा गेलो संकटाना
           त्यांना पाहून वळलो नाही..
पचऊन टाकले दु:ख सारे
         कधीच मी हळहळलो नाही..
आले जीवनी सुख जरी
           कधीच मी हुरळलो नाही..
कधी ना सोडली कास सत्याची
     खोट्यात कधीच मळलो नाही...
रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण
       मी कुणाला कळलोच नाही...!
       मी कुणाला कळलोच नाही...!

 ‌‌‌           कवी  : सुरेश भट
___________________________
कवी श्री सुरेश भट यांची एक अप्रतिम कविता वाचण्यात आली व मनाला खुप भावली म्हणून शेअर करीत आहे.
तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...