Posts

Showing posts with the label आयुष्यावर सुंदर कविता

◾कविता :- संकटच स्वानुभवे... | कवी रा. र. वाघ

Image
सं कटच सकलांना क रतात अनुभवी ट वटवी प्रयत्नांना  च तुराई स्वानुभवी स्वा नुभव साधतांना नु रेनाच शान काही भ र पडे शिकतांना वे गळेच ज्ञान काही स बबीने धडपडे ब ळे युक्ती आजमावी ल क्ष्य साध्य असे घडे ता कदीचा जोर लावी आ ज यश मिळे जरी का लचाच ध्यास होता र त होता खास तरी ती व्र असा यत्न होता गु रु बने संकटच रु ळलेल्या वाटेतच रु क्षपण वाटताच पी ळ पडे दंडातच ते च मानी आवाहने मा र्ग शोधी सुटकेचा ना दी लागे प्रयासने वे ध घेई संकटाचा दृ ढ होते मन असे ढ ळेचना धैर्य कदा ज्ञा त होता मनी वसे न कळत स्थैर्य सदा सा तत्याने परीक्षेचे का र्य संकटाचे चाली  र सरुप विरतेचे ती च ठरे खुण भाली निर्मिती:- रा.र.वाघ,धुळे.  मो.नं.७५०७४७०२६१) _____________________________  सदर कविता आवडल्यास नक्की शेअर करा

आयुष्यावर सुंदर कविता

असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची.. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना.. संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.. करुन जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना, गहिवर यावा जगास  सा-या, निरोप शेवटचा देताना.. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर... विं. दा. करंदीकर.