Posts

Showing posts with the label indian army

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

Image
🌸💐🌸 Plzzzzzzz वाचा रडणार म्हणजे रडणार माझ्या शहिद जवानांना ही कविता अर्पण ..... _______________ _________ ___________________ बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय... तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय... घायाळ जरी झालो तरी  अजूनसुद्धा लढतो आहे आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन पत्र शेवटचं लिहतो आहे, पत्र शेवटचं लिहतो आहे... लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई जशाच्या तश्या आठवतात या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली आसवंसुद्धा गोठवतात खुपदा वाटतं आई तुझ्या कुशीत येऊन निजावं तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं पण मला ठाऊक आहे, असं आता होणार नाही आली वेळ मला सोडून, रित्या हाती जाणार नाही आपलं घर आठवून आई, एकटाच रडतो आहे रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे... तुमच्यासाठी बाबा... बरंच काही करायचं होतं तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं पहा ना बाबा ! दैवानं आपला कसा घात केला माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावरती दिला तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून... मारणाआधीच मारतो आहे मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे.. तुझ्या सगळ्य

माहिती :- आर्मी मध्ये सैनिक केस बारीक का कापतात ?

Image
प्रत्येक देशाचा सैनिक हा आपला देश कसा सुरक्षित राहील, याचाच सतत विचार करत असतो.  पण या सर्व सैनिकांमध्ये एक गोष्ट सारखी असते, ती म्हणजे त्यांच्या केसांचा कट. या सर्व सैनिकांचा कट हा एकसारखाच असतो.   केस बारीक का असतात  ?  निशाणा लावताना लक्ष बनून राहणे.   शत्रूवर निशाणा लावण्यासाठी बारीक लक्ष असणे खूप गरजेचे आहे. अशावेळी निशाणा साधताना केस हे अडथळा निर्मण करू शकतात. जर केस मोठे असतील आणि निशाणा लावताना डोळ्यांवर आले, तर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे केस लहान ठेवले जातात.  सर्दीच्या आजारापासून वाचणे सैनिकांना आपली ड्युटी करण्यासाठी खूप वेळा भर पावसामध्ये उभे राहावे लागते. अशावेळी त्यांचे लांब केस त्यांच्यासाठी समस्येचे कारण बनू शकतात आणि त्यामुळे सर्दीच्या आजारांची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सैनिकांचे केस हे बारीक ठेवले जातात.  समानतेचा भाव विकसित करणे   सैनिकांचे छोटे केस ठेवण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण करणे हे आहे. अधिकाऱ्यांपासून सैनिकांपर्यंत सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण होऊन त्यांनी एक टीम बनून काम करावे, यासाठी असे केले जात