Posts

Showing posts with the label जिवन विचार - 50

जिवन विचार - 50

माणसाचा विकास म्हणजे त्याच्या मनाचा विकास. मनाचे रूपांतर बुद्धीत झाले पाहिजे.     गुरू उपदेश देतील, ग्रंथ ज्ञान  देतील , परंतु तो उपदेश, ते ज्ञान समजण्यासाठी बुद्धीच हवी.  कठोपनिषादात म्हटले आहे , ' बुद्धी तु सारथिं विध्दि!' बुद्धी  ही मानवी जीवनरथाचा सारथी आहे. रथ कोठे न्यावयाचा व कसा चालवायचा ते बुद्धी ठरवील.                         म्हणून बुद्धीचा विकास झाल्याशिवाय मानवाचा विकास होणार नाही.               चाणक्य म्हणतो, "माझे सर्व साथी सोडून गेले तरी मला पर्वा नाही , माझी बुद्धी मला सोडून न  जावो." ========================