Posts

Showing posts with the label जिवन विचार - 143

जिवन विचार - 143

*आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात , त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात , त्यांना हसून माफ करा.* *जीवनात अडचणी येणे हे 'Part of life' आहे. आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही 'Art of life' आहे.* *यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं. कारण , यशाची व्याख्या लोकं ठरवितात , समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.* *आरसा आणि ह्रदय , दोन्ही तसे नाजूक असतात.फरक एवढाच आरश्यात सगळे दिसतात , आणि ह्रदयात फक्त आपली माणसेच दिसतात.* *एका फुग्यावर लिहिलेले सुंदर वाक्य...जे आपल्या बाहेर आहे ते नाही , तर जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला उंच घेऊन जाते.* *"सगळीच वादळं काही तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करायला येत नाहीत तर त्यातील काही तुमचा रस्ता मोकळा करण्यासाठी पण येतात."*