Posts

Showing posts with the label जिवन जगत असताना जीवनात कसा बदल करावा -आयुष्य /जिवन विचार

जिवन जगत असताना जीवनात कसा बदल करावा -आयुष्य /जिवन विचार

Image
विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे साठ हजार विचार करतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत जाते. थोडक्यात माणूस जरी काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल तरी त्यावेळी त्याच्या मनात विचार सुरूच असतात. अगदी सकाळी जाग आल्यापासून रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचारच करत असतो. एखादे काम करत असतानादेखील बॅक ऑफ...