बोधकथा :- हस्तश्रमाने राबनार्यांच्या श्रमाचे मोल करा ..!
🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴🟢🔴 _________________________________________ " ता ई कितीला दिला हा फडा?" " भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला" त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला "दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?" " भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून" मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने. त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला. रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे. " भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले" "अहो ताई मी किंमत कमी करनार नाही " त्या रखुमाईला वाटले, मी किंमत करनार नाही म्हणजे आता मी निघून जातो का काय की.शेवटचा उरला सुरला माल असल्याने कदाचित