पक्ष्यांची सभा - कविता
🌳 *पक्ष्यांची सभा** 🦚 झाडावर भरली पक्षांची सभा मोर नाचरा ,मधोमध उभा--- म्हणाला, माणसास काय झाले? खूपच दिसतात दिनवाने--- पोपट म्हणाला मी गल्लीत पाहिले सुनसान दिसले, नवलच वाटले--- चिऊताई म्हणाली, घाई घाई दूध भाताचा घास मिळतच नाही- कावळा म्हणालाआज दशक्रियेला काव काव ऐकू नाही येत मला--- घार म्हणे ,उंच आभाळी मी गेले एकही विमान नाही घरघरले--- वाहने,कंपनी मॉलही बंद प्रदूषण थांबले न जाणे काय झाले माणसावर असे कसे संकट आले जीव घेण्या कोरोनाने,तया,ग्रासले सर्व पक्षांनी युक्ती केली देवाची एकत्र प्रार्थना म्हटली-- म्हणून पाखरांची काळजी घ्या ठेऊ नका उपाशी अन्न पाणी दया श्रीम शिला पाटील चांदवड नाशिक