◼️ माहिती :- पानाडे पाणी कसे ओळखतात.. सर्वांच्या उपयोगाचे

🧐 मनातील प्रश्न.... पानाडे पाणी कसे ओळखतात.. कृषी दर्पण..... ☑विहीर – कूपनलिके करिता महत्वाची जागा कशी शोधाल..!!! भौ गोलिक रचनेप्रमाणे जमिनीच्या आतील पाण्याचे ओहोळ कसे वाहतात, कुठे एकत्र मिळतात, पाणी कुठे – कसे साठविले जाते, हे विहीर – कूपनलिका खोदताना शोधणे महत्त्वाचे आहे. या साठवणुकीतच विहीर – कूपनलिका खोदली, तर हमखास पाणी लागते. या साठवणुकीतच विहीर खोदली तर हमखास वर्षभर पिण्याचे पाणी मिळेल. नेमके हे ठिकाण शोधणाऱ्यास वॉटर विचर्स किंवा पाणाडे म्हणतात. पाणाडे अशा पाण्याचा शोध पारंपरिक पद्धती वापरून घेत असतात. जमिनीवर पडलेले पाणी प्रथम जमिनीत जिरते. मातीच्या मगदूर व जमिनीच्या उताराप्रमाणे अतिरिक्त पाण्याला गती मिळते. जमिनीची धूप; ओहोळ, नाले, नदी यांच्या निर्मितीचे मूळ कारण पाण्याला मिळालेली गती हेच आहे. पाणी जमिनीवर वाहताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्याला आकर्षित करते व त्यामुळेच झरे, कूपनलिका, विहिरी यांना पाणी मिळते. पाणाडे जमिनीतील पाण्याचा शोध कसा घेतात, ते आपण पाहू. ▪1) भूगर्भ व नैसर्गिक वनस्पतींचा अभ्यास - डोंगराळ, उंच – सखल भाग, पाण्याने...