◼️ कविता :- भक्ती रंग
भक्ती रंग भक्ती रंगी रंगली राधा प्रेमे भजी ती बाल मुकुंदा मीरा मधुराभक्तीची उद्गाती मुरलीधरावर तिची प्रिती महाविष्णूच्या भक्तीत रंगला बाळ प्रल्हाद अढळपदी बैसला पुंडलीकाची मायपित्यावर भक्ती थांबविले विठूराया फेकूनी वीट ती ज्ञानदेव किती भक्ती रंगी रंगले मोठया भावा गुरुस्थानी मानीले नवविधा प्रकार भक्तीचे तरी ईष्ट देव खोल असावा अंतरी श्रवण भक्ती मज बहू प्यारी आळवाया देवा ऊत्तम परी किर्तन प्रवचन सदा ऐकावे ' केशीराज ' तू भक्तिरंगी नाचावे ________________________________ 🙋🏼♂️🙏🏼✍🏽👍🏼 केशीराज शरदकुमार सुमन - ज्ञानेश्वर वेदपाठकI मंद्रुपकर, सोलापूर ___________________________________