जिंकू किंवा मरू - मराठीचे शिलेदार समूहावर दिनांक. ०९/१०/२०२० ला प्रकाशित झालेल्या कविता
कोरोना महामारीसंगे महायुद्ध आमचे सुरू जिंकू किंवा मरू पण मागे कदापि न फिरू...१ मानवता धर्म सर्वश्रेष्ठ सेवा रुग्णांची हो करू होऊन आई नि ताई मायेचा वर्षाव सुरू...२ देशभक्ती मनामनात ईश्वराचे रूप रुग्णात जीव वाचवण्यासाठी कर्तव्य बजावणे सुरू...३ रुग्ण संसर्ग झाला जरी उपचार स्वतःवर करू कोरोनाला भरेल धडकी महायुद्ध रातदिन सुरू....४ वाचवलेत असंख्य प्राण माणसातील या देवांनी जिंकू किंवा मरू बाणा वंदन तयांना सर्व करू...५ सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे कवयित्री/लेखिका/सदस्या मराठीचे शिलेदार समूह परिस्थिती असेल कठीण सामना निर्धाराने करावा जिंकू किंवा मरू या बाण्याने प्रयत्न आपलाच असावा ॥ दुर्धर परिस्थितीत सैन्य देशसेवा निष्ठा ही जपती प्राणाचीही पर्वा न करता अहर्निश देशाला रक्षती ॥ जिंकू किंवा मरू हे तत्वच लढण्याला प्रेरक ठरती देशप्रेम भावनेने लढा निकराचा सैन्य नित्य देती ॥ आत्मनिर्भर बनुनी सारे घडवू दर्शन एकतेचे जिंकू किंवा मरू भावनेने करू निर्मूलन विषाणूचे ॥ प्रयत्न शर्थीचे करताना यशप्राप्ती हमखास होते जिंकू किंवा...