जिंकू किंवा मरू - मराठीचे शिलेदार समूहावर दिनांक. ०९/१०/२०२० ला प्रकाशित झालेल्या कविता

 


कोरोना महामारीसंगे

महायुद्ध आमचे सुरू

जिंकू किंवा मरू पण

मागे कदापि न फिरू...१


मानवता धर्म सर्वश्रेष्ठ

सेवा रुग्णांची हो करू

होऊन आई नि ताई

मायेचा वर्षाव सुरू...२


देशभक्ती मनामनात

ईश्वराचे रूप रुग्णात

जीव वाचवण्यासाठी

कर्तव्य बजावणे सुरू...३


रुग्ण संसर्ग झाला जरी

उपचार स्वतःवर करू

कोरोनाला भरेल धडकी

महायुद्ध रातदिन सुरू....४


वाचवलेत असंख्य प्राण

माणसातील या देवांनी

जिंकू किंवा मरू बाणा

वंदन तयांना सर्व करू...५


सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे  

 कवयित्री/लेखिका/सदस्या 

मराठीचे शिलेदार समूह

परिस्थिती असेल कठीण

 सामना निर्धाराने करावा

 जिंकू किंवा मरू या बाण्याने

 प्रयत्न आपलाच असावा ॥


दुर्धर परिस्थितीत सैन्य

देशसेवा निष्ठा ही जपती

प्राणाचीही पर्वा न करता

अहर्निश देशाला रक्षती  ॥


जिंकू किंवा मरू हे तत्वच

लढण्याला प्रेरक ठरती

देशप्रेम भावनेने लढा

निकराचा सैन्य नित्य देती ॥


आत्मनिर्भर बनुनी सारे

घडवू दर्शन एकतेचे

जिंकू किंवा मरू भावनेने

करू निर्मूलन विषाणूचे ॥


प्रयत्न शर्थीचे करताना

यशप्राप्ती हमखास होते

जिंकू किंवा मरू भावनाच

विजयाप्रत आम्हाला नेते ॥


  दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)

  उस्मानाबाद

 ©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह


मानवता धर्म जपूनी

जिंकू किवा मरु...।

कोरोनाच्या काळात

कर्तव्य बजावताना

मरण आले तरी चालेल

पण कर्तव्य विसरू न

देता सेवा रूग्णाची करु

रुग्ण कोरोना ग्रस्त

असला तरी वाचवू

त्याचे प्राण अन् लढाई

ही लढतच राहू....

प्रयत्न शर्थीचे करुनी

कोरोनाला हद्द पार करु

जीवन सुखकर बनवण्याचा

प्रयत्न हाकरू जिंकू किंवा मरु

कोरोना ग्रस्ताना लढण्यासाठी

ताई, दादा, काका काकू ,आजी

मामा,होऊनी त्यांना उत्साह

अन् जगण्याची उमेद देवू

जिंकू किंवा मरु विर

तरुणा मागे तू हटू नको

प्रयत्न तू करत रहा 

प्रयत्न तू करत रहा 


सौ कुसुम पाटील कसबा बावडा

कोल्हापूर

©सदस्य मराठी चे शिलेदार समूह


जिंकू किंवा मरू, नव्हे

आंम्ही जिंकू आणि जगू

एक दिवस कोरोनालाच

आता कायमचे गाडू... //


धाड घालून अचानक

खूप छळलेस दुनियेला

किती द्वाड नसे करूणा

खूप गिळलेस जीवांना.... //


नाती गोती दुरावली

कित्येकांचे कुंकू पुसले

माय, बाप, बंधू, मित्र

कित्येकांचे आधार तुटले.. //


युवा पोलीस अधिकारी

तू डाॅक्टरांनाही पळवले

आरे अनेक परिवारांचे

आधारवड कोसळले..... //


खूप पडले धारातिर्थी

जग झाले कोरोना युक्त

संयम, शिस्त, खबरदारीने

मानव जात करू मुक्त... //


खूप झाले लाड तुझे 

आता तुझी गय नाही 

भरलाय तुझाच घडा 

इथे तुझी सोय नाही.... //


तुझी आरेरावी मनमानी

मोडून काढू कायमची 

नामोनिशाण मिटवू तुझे 

ही जिद्द आमच्या मनाची... //


विष्णू संकपाळ बजाजनगर औरंगाबाद

©सदस्य मराठीचे शिलेदार समूह


जिंकू किंवा मरू

म्हण झाली जुनी

जिंकेपर्यंत  लढू

ठेवू  ध्यानी मनी

मरणानंतर शुन्य

जगण्यातच अर्थ

सातत्याने  करू

प्रयत्नांची   शर्थ

संकटांवर केवळ

निर्धारानेच मात

तेजाळ  असावी

नित आशा वात

वाघापरी  निर्भय

हरणासम चपळ

संघर्षापार स्थीत

यशस्वीतेचे फळ

जिंकणं हरणं तर

चालतंच वरचेवर

आत्मविश्वास हा

असू  दे स्वत:वर

इतिहास न होता

घडव नवं विक्रम

निष्ठेने  पार पाडू

सत्कार्य  अनुपम


 मीता नानवट‌‌‌कर नागपूर

 सदस्या मराठीचे शिलेदार समूह


भारत भू चा मी सेवक

शूर शिपाई युध्द नायक

आम्ही जिंकू किंवा मरू 

हेची सूत्र कानीमनी धरू ....

गोळीचे वार झेलले 

निधड्या छातीत रुतले

रणकंद संग्राम सुरु

विक्रमाचा ध्वज उभारू ....

नामोहरम करण्या आता

सैन्य तुकडी सज्ज परार्था

कुरूक्षेत्री उपदेशी भगवान

श्रीकृष्ण बोधे अर्जुन पार्थास....

निस्वार्थ जिंकू किंवा मरू

खलबलले मसलतेचे डमरू 

 नौबत झडकरी हिंदसेना

येतो देश पाहण्या पुन्हा....


प.सु. किन्हेकर, वर्धा

©सदस्य मराठीचे शिलेदार समूह



 आमचा मान तू  आमचा अभिमान तू

 जिंकण्याचे स्वप्न बाळगणारा भारत भूमीचा सन्मान तु


 जिंकू किंवा मरू म्हणत भ्याड पणाचा केलास धिक्कार 

 आणि देशाचे स्वप्न केलेस तू साकार


 शान राखली देशाची परिसीमा गाठली बदल्याची

 वेळ आणलीस शत्रूवर तू पश्चातापाची


 शत्रूला साखरझोपेत गाफील ठेवूनी  

हल्ला करून धाडिलेस यम  सदनी


 आत्मशक्ती अन देशभक्तीच्या पेटवित  मशाली 

थांबविल्यास दहशतवाद्यांच्या कारवाया भोवताली


 तुझ्या कर्तृत्वाने धन्य झाली ती जननी 

सुखावून गेली तुझी सखी साजणी


 तुझ्या धैर्याचे गातो आम्ही गान 

 तूच आमचा सार्थ अभिमान


 तुझ्या कीर्ती पुढे झुकल्या आमच्या माना 

 धन्य धन्य ही आमची वायुसेना.


 सौ अनिता व्यवहारे

 ता श्रीरामपूर जि अहमदनगर

 सदस्या मराठीचे शिलेदार समूह


स्त्री जातीच्या रक्षणार्थ

युद्ध आमचे सुरु

जिंकू किंवा मरू


लचके तोडणाऱ्या नराधमाना

बंदिवान करू

माता भगिनींनी छेड काढणाऱ्याशी

दोन हात करू


लहान आपल्या बहिणी मुलींना

कराटे प्रशिक्षण देऊ

वेळ पडल्या स्वरक्षणार्थ

लढायला सज्ज करू


भारताची संस्कृती जपणाऱ्या

समाजातल्या सर्व स्त्रियांना

अभिवादन करू


आपल्या जवळच्या

प्रत्येक स्त्री चां सन्मान 

करण्या सुरुवात करू

जिंकू किंवा मरू 

माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध झाले सुरू


मिलन भूपेन डोरले पुणे

सदस्या मराठीचे शिलेदार समूह



आम्ही बळीराजे.....!

आतापर्यंत जगत आलो

जिंकू किंवा मरू

म्हणून......,

परंतु आता

मारु आणि जिंकू

आसमानी,सुलतानीशी लढून...!

बास झाले आता

सुलतानीचे

लाड......,

निवडून आल्यानंतर

नाही कामी आले

हटवायचे धाड धाड....!

आसमानीशीही आता

ठरवलेय

लढायचे......,

विम्याची कवच कुंडले

पिकांना घालून

पैसे वसूल करायचे....!

आत्महत्येचा वटवृक्षही

आता उपटून टाकू

बुडापासून......,

भावी पिढीच्या मनी

मारु आणि जिंकूचा मंत्र

भिनवू गर्भापासून......!


श्री.मंगेश पैंजने सर,

ता.मानवत,जिल्हा-परभणी,*

*© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*



जिंकू किंवा मरू शेवटच्या

श्वासा पर्यन्त आम्ही लढू

भारतभूचे आम्ही लेकरे 

इतिहास नविन सारे घडू


सिमेवरती सैनिक आम्ही

शत्रुशी दोन हात करू

कर्तव्यास आम्ही तत्पर

देशसेवेत प्राण आर्पण करू


मानवतेचे रक्षक आम्ही 

डॉक्टर बनून सेवा करू

कोरोनी देऊन लढा

कोरोनास हाद्दपार करू


काळया आईचे आम्ही

लेकर शेतकरी सारी

घाम गाळून पिकवू शेती

प्रत्येकाला घास भरवू भारी


सर्व एकजुट होऊन 

बंधुभावाची जपवणूक करू

जिंकू किंवा मरू 

कोरोनाशी युद्ध आमचे सुरू


विजय शिर्के , औ. बाद .

© सदस्य मराठीचे  शिलेदार समूह .



हुंडा घेणाऱ्यांच्या 

विरोधात आता

युध्द आमचे सुरू

जिंकू किंवा मरू


शिकली सवरलेली ती

हुंडा घेण आहे गुन्हा

कायद्याचा आधार घेवू

नका करु कोणी पुन्हा


काबाडकष्ट करुन

कोडकौतुकाने वाढवतात

तुम्ही मुलाकडचे मात्र

हुंड्यासाठी अडवतात


आमची धनाची पेटी

काळजावर दगड ठेवून देतो

तुम्हांस कमी पडले की छळतात

उघड्या डोळ्यांनी आम्ही पहातो


आता मात्र सर्व बंद करु

हुंडा घेणा-यास अद्दल घडवू

देणा-या मुलीच्या बापास

विरोध करुन अडवू


सौ.मनिषा दिपक सामनेरकर

            पालघर

सदस्य मराठीचे शिलेदार समूह

    

जिंकू किंवा मरु,व्हँक्सिन शोधून काढू

कोरोनावर करु प्रयोग नवे  आपण सारे लढू...!!धृव०!!


कोरोनाची आली साथ

मारा मिळूनी त्याला लाथ

पालन तेवढे करायाचे मास्क लावून तोंडाला फिरु...

    जिंकू किंवा मरु...!!१!!


ठेवा अंतर सुरक्षित दोघांमधूनी

मनातील भिती टाका काढूनी

सेनेटायझरनी हात साफ करु...

    जिंकू किंवा मरु....!!२!!


लाँकडाऊनचे सुटले एकदाचे ग्रहण

अनलाँकडाऊन चालू झाले होई उदरभरण

आपण आपली काळजी तेवढी करु...

    जिंकू किंवा मरु...!!३!!


उराशी ठेऊ स्वप्न उद्याची खरी

महामारीवर मात करुनी मारु नव्याने भरारी

नव्या जोमाने नव्या दमाने चालू द्या तारु...

    जिंकू किंवा मरु...!!४!!


नका ठेवू नात्याला अलिप्त कोठे तरी साधी

मिळेल प्रेमाने जगण्याची संधी

नजर आपली प्रितीची असावी सदाची ठरु....

    जिंकू किंवा मरु...!!५!!


©️✍️..

*मा.kvकल्याण राऊतसर* 

मराठवाडाप्रदेश लातूर 

©️मराठीचे शिलेदार 

9421372689


जिंकू किंवा मरू

अन्याया विरुद्ध लढू 

परी लाचारी ना पत्करू

अशी मनी रुजवीली भावना 

स्वातंत्र्य सैनिकांनी पारतंत्र्य काळात 

अन् स्वातंत्र्याची सोनेरी पहाट 

उजळली आपल्या आयुष्यात 

परंतु आजही कळत नाही बहुतेकांना 

आपण जगतोय पारतंत्र्यात

अनेक अन्याय करतो सहन 

अन् अमानुष छळ 

पण अन्याया विरूद्ध लढण्यास 

एकवटत नाही बळ

उठ हो जागा परत एकदा 

अन्याचा कर सामना 

आत्मसंम्मान जपण्या स्वतःचा

प्रथम युद्ध कर स्वतः बरोबर 

अन् घे गुलाम मनाला जिंकून एकदा 

मन असल खंबीर अन् मजबूत 

यश नक्कीच मिळेल तुजला



सौ रुपाली म्हस्के गडचिरोली

 सदस्या मराठीचे शिलेदार समूह




Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !