Posts

Showing posts with the label सामान्यांचे असामान्यत्व - बोधकथा

सामान्यांचे असामान्यत्व - बोधकथा

सामान्यांचे ‘असामान्यत्व’ एका अत्यंत हुषार व टॅलेन्टेड ऍटोमोबाईल इंजिनीयरने त्याच्या बॉससाठी, म्हणजे त्याच्या कंपनीच्या सीईओ साठी एक खास मोटार तयार केली. ही गाडी भव्य होती. यामध्ये अनेक आधुनीक सुवीधा पुरवण्यात आल्या होत्या. गाडीच्या शेपमूळे व रंगसंगतीमूळे ही गाडी अत्यंत देखणी व रुबाबदार दिसत होती. कारखान्यातल्या सर्व प्रकारच्या टेस्टना ही गाडी उत्तम रितीने पास झाली होती. ही गाडी बघून सीईओ साहेब तर खुषच झाले होते. आता ही गाडी कारखान्याच्या बाहेर काढायची होती. गाडी कारखान्याच्या बाहेर काढताना मात्र एक अडचण आली. त्या गाडीची उंची त्या कारखान्याच्या ‘गेट’ पेक्षा दोन एक इंचांनी जास्त होती. त्यामूळे ती गाडी बाहेर काढता येत नव्हती. गाडी डिझाईन करताना त्या इंजिनीयरने गेटची उंची विचारात घेतलेली नव्हती. त्यामूळे हा सगळा घोटाळा झाला होता. आपल्याकडून एवढी साधी गोष्ट कशी राहून गेली याबद्दल त्या ऍटोमोबाईल इंजिनीयरला वाईट वाटत होते व खंत पण वाटत होती. गाडी बाहेर कशी काढायची हे ठरवण्यासाठी सीईओंनी सगळ्या टॅलेन्टेड मॅनेजर्सना व डिपार्टमेन्ट हेडसना गेटपाशी बोलावले. ‘गाडीची उंची गेटच्या उंचीपेक्षा थोडीशी...