जिवन विचार - 136
🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा. 🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही. कारण..पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही.. 🔴वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.." 🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. 🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. 🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..! 🔴मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि...राजहंस मरताना सुद्धा गातो...दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात. 🔴किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व