Posts

Showing posts with the label माणसाची पारख - बोधकथा

माणसाची पारख - बोधकथा

हिवाळा चालू असल्यामुळे थंडीच्या दिवसांत एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या🌞 कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, "माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये." जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सारख्याच  असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो.रंग ,ठेवण, सारख्याच  प्रकाशमान !! राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत." तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे...