Posts

Showing posts with the label शांततेचा फायदा - बोधकथा

शांततेचा फायदा - बोधकथा

✍  एकदा एका शेतकऱ्याला जाणवले की त्याचे हातातील घड्याळ धान्याच्या कोठारात हरवले आहे.  जरी ते एक सामान्य घड्याळ होते तरी त्याचे लेखी त्याला अफाट भाावनिक मूल्य होते.  बराच वेळ गवतात सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते सापडेना.  मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले व त्यानी त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ शोधून देईल,त्याला बक्षिस मिळेल.... .  बक्षिस मिळेल,  हे ऐकून सगळी मुले  कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला लागली  पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना.  नेमके जेंव्हा त्या शेतकर्याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन शेतकर्याकडे शोधण्याची एक संधी मागू लागला.  शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की "बिघडले कुठे...!  हा मुलगा प्रामाणिक दिसतोय. देऊ या त्याला एक संधी.......  शेतकर्याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठारात पाठवले.  थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला.  शेतकऱ...