Posts

Showing posts with the label जीवन प्रवास

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

Image
नमस्कार  मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर               ( डॉ, राजेंद्र भारुड )_       ___ माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात  भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं.  जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती  प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती. अभिनेता अमीर खान आणि मी  मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली का...

◼️कविता :- जीवन प्रवास

Image
निघालो प्रवासा, सोबतीला साथी. मनी नाही भिती, कसलीच...धृ डोईवर नभ, धरेवर पाय. हीच माझी माय, भासे मज...१ कष्ट रात दिस, जीवन प्रवास. फुलवून खास, वाढविला...२ दिसे सुखी जन, भरले नयन. सुखावले मन, आनंदाने...३ सुखाचा सागर, करुया जागर. मायेचा पाझर, काळजात...४   ✍️ खंदारे सुर्यभान गुणाजी    मु.पो.जलधारा ता.किनवट      संवाद- 9673804554