मन मनाच्या शोधात !
मन मनाच्या शोधात...! मन मोकळं करायचं असेल तर स्वतःशीच एकांतात संवाद करावा ...उत्तर सापडत असतं...! कारण शंभर टक्के आपलं ऐकून समजून घेणारं मन ...एखाद्या मनासाठी जणू अस्तित्वातच नसतं... ! क्वचितच एखाद्या मनाला असं मन गवसतं ...जे प्रत्येक्ष आपल्याच मनाची प्रतिमा असतं...! अशीच आज भरल्या घरात सारं भौतिक सुखवैभव असूनही अशांत शारदा एकटीच देव्हाऱ्यापुढे बसून देवाशी भांडत होती, रडत होती ,बोलत होती....! "देवा, का मला जन्माला घातलय रे...काय साध्य करायचं होतं तुला माझ्या या आयुष्यातून"...प्रत्येकाचे जन्माचे विधिलिखित मांडलेले असते...पण मला कळतच नाही मी काय कसं वागू ..सर्वांच्या मनासारखं, हवं नको पुरवण्यातच दैनंदिन आयुष्य चाललय...पण मलाही मनातनं काही जाणीवा आहे ,जरा काही निवांतपण, काही हवंय का, हा विचारच नाही करत कोणी घरात...! आणि जसं मला आयुष्य जगायचं होतं तसं मला वास्तव जगणं नाही दिलस रे ,मग विचार करायची बुद्धी तरी का दिलीस रे?...मंदच ठेवायचस ना..घुम्याबैलासारखं कामच करत रहायला...! नियतीने बांधून टाकलय कि मीच स्वतःला गुंतून घेत