Posts

Showing posts with the label लस्सी एक प्रेरणादायी किस्सा...

लस्सी एक प्रेरणादायी किस्सा...

लेखक  - अनामिक.     शहरातील एका चर्चित दूकानात लस्सी ची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्र-मंडळी आरामात बसून एक दूसऱ्याची चेष्टा मस्करी करीत होतो‌. तेवढ्यात 70-75 च्या वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली.      तिची कंबर वाकलेली होती, चेहऱ्याच्या सुरकुत्यांमध्ये भुक तरंगत होती. डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते. त्यांना बघून मनात न जाणे काय आले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन त्यांना विचारले, "आजी लस्सी पिणार का?"     माझ्या असे विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त अचंभित झाले. कारण, जर मी त्यांना पैसे दिले असते तर, फार तर 5 किंवा 10 रुपये दिले असते, पण लस्सी तर 25 रुपयाला एक होती. म्हणून लस्सी प्यायला दिल्याने मी गरीब होण्याची आणि त्या म्हाताऱ्या आजी कडून मी ठगला जाऊन श्रीमंत होण्याची शक्यता खुपच वाढली होती.      आजी ने संकोचून "हो" म्हटले व आपल्या जवळ जे मागून जमा झालेले 6-7 रुपये होते ते आपल्या कापऱ्या हातांनी माझ्यासमोर धरले. मला काही समजले नाही, म्हणून मी त्यांना विचारलं, "हे कशासा...