जिवन विचार 12
*'वाद'आणि 'चर्चा' यात फरक काय..?* वादातून "भांडणं" होतात; चर्चेतून "गोष्टी स्पष्ट" होतात. वाद "अहंकार आणि संकुचित मनातून" होतो; तर चर्चा "मोकळ्या मनातून" होते..... वादात "अज्ञानाची देवाणघेवाण" होते, तर चर्चेत "ज्ञानाची देवाण घेवाण" होते. वाद ही "रागाची अभिव्यक्ती" आहे; तर चर्चाही "तर्काची अभिव्यक्ती" आहे... वादातून कोण बरोबर हे "सिध्द करण्याचा प्रयत्न होतो" तर चर्चेतून' "काय बरोबर हे सिध्द करण्याचा" प्रयत्न होतो वाद "निरर्थकच" असतो.. *"वादा" पेक्षा "चर्चेने" आणि "चर्चे" पेक्षा, "संवादाने" प्रश्न "मार्गी" लागतात.*