31 महान विचार
01. राज्यामध्ये न्यायाधीश जास्त असणे म्हणजे राज्यात दुराचारी लोक जास्त असल्याचे चिन्ह आहे. -इब्जा बाजा. 02. मन:शांतीसाठी नेहमी ग्रंथ वाचा, जीवनात ते धैर्य व आधार देतात. - न. शे. पोहनेरकर. 03. तुमच्या शत्रूला ओळखा व स्वत:ची मर्यादा लक्षात ठेवा, यामुळे तुम्ही शंभर लढाया जिंकाल, आणि तुमच्या पदरी अपयश येणार नाही. -सन व्ह झू. 04. सर्व विधी विषमय आहेत. -संत चक्रधर. 05. सत्य झाकले जाईल, पण कधीच मालवले जाणार नाही. -लिवी. 06. जग सामावून घेण्यासाठी आणि ते बदलण्यासाठी माणसाला कलेची आवश्यकता आहे. - फिशर. 07. ज्याला थोड्या गोष्टींबाबत खूप ज्ञान असते, त्यालाच तज्ञ म्हणतात. -एन. एम. बटलर. 08. जीवनातल्या नित्यक्रमांचे जेव्हा उत्सव होतात, तेव्हा आयुष्य आनंदी होते. -साने गुरुजी. 09. ज्याचा अनुभव आलेला आहे असे अनुमान स्वीकारावे. प्रत्यक्षाच्या कसोटीला टिकेल ते अनुमान स्वीकारावे. -चार्वाक. 10. ज्ञानी गरीब चांगला, पण धनवान मूर्ख फार वाईट ! -हितोपदेश. 11. जो स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वांत उत्तम पुरुष समजावा. -गौतम बुद्ध. 12.कोणत्याही क्षेत्रांत यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शि...