31 महान विचार

01. राज्यामध्ये न्यायाधीश जास्त असणे म्हणजे राज्यात दुराचारी लोक जास्त असल्याचे चिन्ह आहे. -इब्जा बाजा.


02. मन:शांतीसाठी नेहमी ग्रंथ वाचा, जीवनात ते धैर्य व आधार देतात. - न. शे. पोहनेरकर.



03. तुमच्या शत्रूला ओळखा व स्वत:ची मर्यादा लक्षात ठेवा, यामुळे तुम्ही शंभर लढाया जिंकाल, आणि तुमच्या पदरी अपयश येणार नाही. -सन व्ह झू.



04. सर्व विधी विषमय आहेत. -संत चक्रधर.



05. सत्य झाकले जाईल, पण कधीच मालवले जाणार नाही. -लिवी.



06. जग सामावून घेण्यासाठी आणि ते बदलण्यासाठी माणसाला कलेची आवश्यकता आहे. - फिशर.



07. ज्याला थोड्या गोष्टींबाबत खूप ज्ञान असते, त्यालाच तज्ञ म्हणतात. -एन. एम. बटलर.



08. जीवनातल्या नित्यक्रमांचे जेव्हा उत्सव होतात, तेव्हा आयुष्य आनंदी होते. -साने गुरुजी.



09. ज्याचा अनुभव आलेला आहे असे अनुमान स्वीकारावे. प्रत्यक्षाच्या कसोटीला टिकेल ते अनुमान स्वीकारावे. -चार्वाक.



10. ज्ञानी गरीब चांगला, पण धनवान मूर्ख फार वाईट ! -हितोपदेश.



11. जो स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वांत उत्तम पुरुष समजावा. -गौतम बुद्ध.



12.कोणत्याही क्षेत्रांत यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका. -आचार्य अत्रे.



13. माणूस कितीही विव्दान असला तरी, तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वत:ला मोठा मानू लागला, तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वत: आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार ? -गौतम बुद्ध.



14. एक विव्दानची ताकत एक लाख मुर्खांहून अधिक असते. -विनोबा भावे.



15. गुलामगिरी प्रथम सोडून द्या. -विवेकानंद.



16. दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आतमध्ये ज्योत ही हवीच ! -विनोबा भावे.



17. तत्वाला तर्काने समजून घ्या. अनुभवाने समजून घ्या व नंतर स्वीकार करा. -महावीर.



18. जो विचारी आहे तो कमी बोलतो व जो जास्त बोलतो तो कमी विचार करतो. -विल्यम शेक्सपिअर.



19. सुप्त चैतन्य व निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे एक साधन म्हणजे शिक्षण होय. -विनोबा भावे.



20. क्षणाचा राग जीवनाचा विध्वंस करू शकतो. -म. गांधी.



21. ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत गरज आहे, ती माणसास पशुकोटीतून वर काढते. -दुर्गा भागवत.



22. उतू गेलेल्या दुधाबद्दल खंत करून काय उपयोग ? -मानवेंद्र रॉय.



23. तुमच्या पूर्वजांकडून जे मिळाले आहे, ते परत तुमच्याकडून भर घालून वाढवा. नाहीतर ते तुमचे कधीच राहणार नाही. -गोयेथ.



24. एकटा उरलो तरी फिकीर नाही, हातातला ध्वज सोडणार नाही. लढता लढता मरण यावे, ते वस्त्रची माझे कफन व्हावे. -हिटलर.



25. धर्म, संस्कृती आणि इतिहास यांच्या जुन्या पुराण्या गोड गोड गप्पांनी जगात कुणाचा उद्धार झाला आहे. -वि. स. खांडेकर.



26. मूर्ती स्वत:चे रक्षण करीत नाही मग इतरांचे कसे करणार ? -बाबा पदमनजी.



27. वाईट हस्ताक्षर, ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे. -म. गांधी.



28. जीवनाला बुद्धीप्रमाणे भावनेचीही जोड असावी. -वि. स. खांडेकर.



29. आपल्या अज्ञानाची जाणीव ज्याला असते, तोच खरा ज्ञानी. -म.गांधी.



30. प्रामाणिक प्रेमासाठी बदनामी पत्करावी लागली तरी युवकांनी त्यास तयार राहिले पाहिजे. -राममनोहर लोहिया.



31. धर्माच्या नावाखाली अधर्म चालू असतो. -संत तुकाराम.
 

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...