◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav
आज जे आहेत ते उद्यास नाहीत ।।धृ ।।
माणसा जीवन हे विशिष्ट ।
क्षणोक्षणी त्यात कितीतरी कष्ट ।।
त्या कष्टास चल तू सोशीत ।।१।।
जीवन हे एक दुःखाचा बाजार ।
सुख लोभाचा रे त्यास आजार ।।
त्या आजारास चाल तू विसरित ।।२।।
जीवन सुख दुःखाचा खेळ
क्षणोक्षणी संपते येते वेळ
वेळेचे जाणुनी घे हित ।।३।।
एकदाच येते हे जीवन ।
वाग सर्वां सोबत आनंदानं ।।
आनंदात राहा गात गीत ।।४।।
जसं दिल देवान जिवन ।
तसं तोच देईल मरण ।।
मरणास नको जाऊ तू भीत ।।५।।
-©arjun apparao jadhav
खुपच छान कविता सर
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteNo 1
ReplyDeleteChan poem re arjun
ReplyDeleteNice poem
ReplyDelete