बोधकथा :- संवाद देवाशी
देवासमोर उभा होतो हताश मी हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून “देवा !” मी म्हणालो, “काय करू कळत नाही” ... “प्रश्नाच उत्तर मिळत नाही” “विश्वास ठेव” देव म्हणाला “देवा सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत” “विश्वास ठेव” देव म्हणाला “देवा आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही तर कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे याचा तुझ्याकडे काय पुरावा ? ” शांतपणे हसत देव मला म्हणाला “पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर” “मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तेव्हा तुझा रोप जन्म घेण्यावर” “बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत, विश्वास असतो त्याचा, तिने साम्भाळून घेण्यावर” “उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मीटतो, विश्वास असतो तेंव्हा तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर” “आज माझ्या दारी येऊन, आपलं मनातलं दुखः घेऊन, विश्वास आहे तुझा कारण मी हाक ऐकण्यावर” “असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात” “आजची स्थिती अशीच राहील,असं कुठेही लिहिलेल नाही उद्याच चित्र कसं राहील, तू काहीच पाहीले...