बोधकथा :- संवाद देवाशी

देवासमोर उभा होतो
हताश मी हात जोडून
डोळ्यामध्ये पाणी होते
मनातून पूर्ण मोडून
“देवा !” मी म्हणालो, “काय करू कळत नाही”
... “प्रश्नाच उत्तर मिळत नाही”
“विश्वास ठेव” देव म्हणाला
“देवा सगळेच रस्ते बंद आहेत
आशेचे दिवे मंद आहेत”
“विश्वास ठेव” देव म्हणाला
“देवा आज असं वास्तव आहे
जिथे आशेचा किरण नाही
उद्या काही छान असेल
असा आजचा क्षण नाही
तर कशावर मी विश्वास ठेवावा
जगामध्ये विश्वास आहे
याचा तुझ्याकडे काय पुरावा ? ”
शांतपणे हसत देव मला म्हणाला
“पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून
विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर”
“मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो
विश्वास असतो तेव्हा तुझा रोप जन्म घेण्यावर”
“बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत,
विश्वास असतो त्याचा, तिने साम्भाळून घेण्यावर”
“उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मीटतो,
विश्वास असतो तेंव्हा तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर”
“आज माझ्या दारी येऊन, आपलं मनातलं दुखः घेऊन,
विश्वास आहे तुझा कारण मी हाक ऐकण्यावर”
“असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात”
“आजची स्थिती अशीच राहील,असं कुठेही लिहिलेल नाही
उद्याच चित्र कसं राहील, तू काहीच पाहीलेल नाही”
“जिथवर तुझी दृष्टी आहे, त्याही पुढे सृष्टी आहे”
“तुझ्या बुद्धीच्यापलीकडेही बऱ्याच गोष्टी घडत असतात
आशेचे तुटलेले धागे तुझ्या नकळत जोडत असतात”
“तुझ्या नकळत तुझ्यासमोर, असा एक क्षण येईल,
ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न खरं होईल”
“म्हणून....सगळे रस्ते बंद होतील
तेंव्हा फक्त ‘विश्वास ठेव’
जिथे संपते मर्यादा तुझी,
तिथून साथ देतो देव !”

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !