Posts

Showing posts with the label संत सेवालाल महाराज

◼️ संत रामराव सेवालाल महाराज :- एक संत असाही

Image
संत सेवालाल महाराजांचे वंशज समाजाचे धर्मगुरू डॉ . रामराव महाराज यांचे मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. बंजारा समाजाचे रामराव बापू महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 रोजी पोहरादेवी येथे झाला. त्यांची प्रकृती वर्षभरापासून अस्थिर होती. काही महिन्यापूर्वी शोषणाचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. काल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्यासोबत महंत शेखर महाराज होते.तसेच राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशन भाऊ राठोड होते. रामराव महाराज यांनी 1948 मध्ये पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या गाधीवर वयाच्या 14 व्या वर्षी परिसरातील बावन गायीच्या नाईक यांनी संत परशराम महाराज शिवलिन झाल्यावर बसवले. 12 वर्षे अनुष्ठान व 12 वर्षे मौन धारण केल्यावर बापू यांनी देशात भ्रमंतीला सुरुवात केली. बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री अकरा वाजता जगाचा निरोप घेतला. रामराव महाराज यांच्याविषयी बंजारा समाजाची श्र