मुलीचा शाळेत पहिला नंबर आला म्हणून बापाने मुलीला हॉटेलमध्ये घेऊन आला आणि वाचा तिथे काय घडले.
मी ऑफिस मधून घरी जाता जाता एका हॉटेलमध्ये गेलो, वेळ संध्याकाळची, तरी 7 वाजलेले, तेच हॉटेल तोच कोपरा तोच चहा आणि मित्राची वाट पाहत बसलो होतो. चहाचा एक झुरका घेतला तेव्हा, माझ्या टेबलासमोरील दुसऱ्या टेबलवर एक माणूस आणि 8/10 वर्षाची त्याची मुलगी येऊन बसली.शर्ट ही फाटका अगदी त्याच्यासारखाच, वरची दोन बटने गायब,मळकी पॅन्ट थोडी फाटकी, मजुरी करणारा वेट बिगारी असावा तो माणूस,मुलीने छान दोन वेण्या घातलेल्या,साधारण फ्रॉक पण स्वच्छ धुतलेला होता, तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आणि कुतूहल दिसत होते, ती हॉटेलमध्ये सगळीकडे डोळे मोठे करून पाहत होती. डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा, खाली बसायला गुबगुबीत सोफा, ती अगदी सुखावली होती, वेटरने दोन स्वच्छ ग्लास थंडगार पाणी त्यांच्यासमोर ठेवलं, पोरी करता 1 डोसा आणा कि !!.त्या मुलीच्या बापाने वेटरला सांगितलं, मुलीचा चेहरा अजून फुलला, तुम्हाला नाय सांगितले !,असे मुलीनं बापाला विचारले, त्यावर बापाने मला काही नको, तो बाप वेटरची नजर चुकवत म्हणाला, थोड्या वेळात वेटर डोसा,चटणी, सांबार वेगळं घेऊन आला. गरमागरम मोठा फुललेला डोसा खाण्यात ती मुलगी गुंग झाली, तो त...