मासे खाल्याने ह्रदयास होणारे फायदे - आरोग्य
महिन्यातून दोनवेळा मासे खाल्ल्याने शरीरातील चांगल्या कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. चरबीयुक्त माशांमुळे ‘हाय-डेन्सिटी लिपोप्रोटिन’ (एचडीएल) कणांचे प्रमाण वाढते.त्यालाच ‘गुड कॉलेस्ट्रॉल’ असेही म्हटले जाते. हृदयाच्या रोग्यासाठी ते अत्यंत पोषक असते. त्याचबरोबर ‘कॅमेलिना ऑईल’ दिवसातून 30 मिली या प्रमाणात घेतल्यास त्याचाही हृदयाला लाभ होतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. त्यामध्ये ‘अल्फा-लिनोलेनिक अॅसिड’ आणि ‘ओमेगा-3’ हे फॅटी अॅसिड प्रचूर प्रमाणात असते. *🐟 ह्रदय विकारासाठी लाभदायी * माशांमध्ये असणारे त्यामध्ये‘अल्फा-लिनोलेनिक अॅसिड’ आणि ‘ओमेगा-3’ हे फॅटी अॅसिड हे ह्रदय आणि धमनी या स्नायुला मजबुत बनवते. कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि रक्ताच्या वाहिन्या सुरळीत होण्यासाठी मदत होते. वैज्ञानिकांच्या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, जी लोक महिन्यातून दोनवेळा मासे खातात त्यांच्या ह्रदयाच्या विकाराचे धोके कमी होण्यास मदत होते. *🐟 लठ्ठपणा दुर होण्यास मदत होते*...