नोट शंभरची, गुरुकिल्ली जगण्याची!
जुनी घटना आहे. पुण्यातील एका एमबीए कॉलेजवर मी व्याख्यानासाठी गेलेलो. परीक्षा झाल्यावर जगाच्या बाजारात यशस्वी कसे व्हावे, साधारण या विषयावर बोलण्यासाठी मी तिथं निमंत्रित होतो. त्यावेळी मी सुरुवातीला एक वेगळा प्रयोग केला अन तो यशस्वी झाल्याचे नंतर समजले. तर त्यावेळी मी नेमकं काय केलं, ते इथं सर्वाना सांगतोय. व्यासपीठावरून मी सुरुवातीलाच सांगितलं की, आज लेक्चर वगैरे देऊन बोअर करणार नाहीये तर जस्ट गप्पा मारूया. (1 मिनिटात सगळे आपोआप रिलॅक्स झाले) नंतर म्हणालो, तुमच्याकडे शंभर रुपयांची नोट असेलच, तर ती खिशातून काढून हातात धरा. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी एकमेकांकडून घ्या." त्याप्रमाणे सर्वानी शंभरची नोट हातात धरली. मी : "आता ती नोट त्याच हाताने चुरगळा. मात्र इतक्या जोरात नको की फाटेल, अन काळजी करू नका, तुमची नोट वाया जाणार नाही तर उलट आयुष्यभर तुम्हाला प्रेरणा देत राहील, ट्रस्ट मी" त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी नोट हळुवार चुरगाळली. मी : "आता अजून थोडी जास्त व बारीक चुरगळा" त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी नोट अजून बारीक चुरगाळली. मी : आता उभे राहा व ती नोट पॅन्टच...