जिवन विचार - 57
सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्यविचार, सत्यआचार आणि सत्यउच्चार होय. सत्य आणि प्रामाणिकपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सूर्य 🌞 आणि चंद्र 🌚 🌴🌳🌺🍂🐚🌎☘ निसर्गाची वास्तविक किमया आहे. सूर्य 🌞-🌚 चंद्र म्हणजे निसर्गातील शाश्वत सत्य होय. शाश्वत तेज होय. सत्य, अहिंसा आणि प्रेमाची पूजा बांधणारे महात्मा गांधी एक तेजःपुंज व्यक्तीमत्व होतं. सत्य, स्वच्छता आणि निरलसता शिरोधार्य मानणारे संत गाडगेबाबा एक तेजोमय व्यक्तीमत्व होतं ! सत्य , शौर्य आणि निर्धारानं पावलं पुढं टाकणारे छञपती शिवाजी महाराज एक तेजस्वी व्यक्तीमत्व होत. अशी कितीतरी उदा.आपल्याला माहिती आहे. आपल्या दैनंदिन जीवनात सत्याचा वापर करून आपल जीवन सतेज , प्रसन्न , टवटवीत , प्रफुल्लीत आणि तेजोमय ठेवलं पाहिजे !! खरं तर ' सत्यमेव जयते' हाच आपल्या जीवनाचा मंञ व्हावा!