जिवन विचार - 118
या जगात प्रत्येक माणसाला निसर्गाने उपजत शक्ती, बुद्धी भावना आणि मनोवृत्ती दिलेल्या असतात. प्रत्येकाच्या जीवनात त्याच्या अंगभूत वृत्तींचा सातत्याने विकास होत असतो, हा एक निसर्गनियम आहे.पण आपण याचा विचार न करता आपल्या पाल्यास, मुलास त्याच्या इच्छेविरूध्द शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. *फलस्वरुप काय घडतं ?* त्या मुलाच्या जीवनात आपण निराशा, दुःख , उदासीनता, कंटाळा , आणि तिटकारा निर्माण करीत असतो. *माणसाला जे आवडतं ते तो लक्षपूर्वक करतो, जे आवडत नाही त्याकडं तो लक्षपूर्वक दुर्लक्ष करतो.* 🙏 म्हणून मुलाला त्याच्या कलाप्रमाणं शिक्षण घेऊ द्या त्यात तो रममाण होईल. त्याच्या इच्छेविरूध्द जर त्यास शिक्षण दिलं जात तेव्हा तो नाइलाजानं पाट्या टाकण्याच काम करीत असतो. आपण आपल्या मनात रंगविलेल्या कार्याविषयी काम करायला मिळालं की त्यात यश मिळत आणि माणूस ते कार्य आवडीने करतो. *🙏🙏आपण आपल्या मुलाची , पाल्याची मानसिकता जोपासावी.*