Posts

Showing posts with the label 😩कोरोना: जीवनावर परिणाम

कविता :- शाळा सुरू करा ना गुरुजी

Image
एक विद्यार्थी आपल्या गुरुजींना शाळा सुरू करण्याची  विनंती करतो आहे. बस झालाय आता   या कोरोनाचा चाळा विनंती एकच गुरुजी...🙏.... तुम्ही सुरू करा शाळा ऑनलाईन शिक्षण डोक्यात नाही शिरत मोबाइलचा अभ्यास काही मनात नाही भरत कृतीयुक्त खेळ तुम्ही आम्हा सोबत खेळा विनंती एकच.....🙏....तुम्ही शाळा सुरु करा। मायबाप म्हणती हा समय आला कैसा पोट भरण्याइतका बी जवळ नाही पैसा रिचार्ज तुझ्यासाठी कोठून मारु बाळा विनंती एकच.....🙏.....तुम्ही शाळा सुरु करा। मोबाइल येऊ द्या किती थ्रिजी किंवा फोरजी साऱ्या गावाला आता आठवतात गुरुजी मार्ग यातून तुम्ही कसातरी काढा विनंती एकच....🙏....तुम्ही शाळा सुरु करा। न्यावी लागतात चारायला रानामाळात  ढोरं गावकरी म्हणती सगळी बिघडून गेली पोरं रंग बी माझा पडला आहे काळा विनंती एकच...🙏.....तुम्ही शाळा सुरु करा। आनंदाचे दिस होते गेले सारे सरुन आठवण होते शाळेची डोळे येती भरुन स्वप्नामधी येते रोज माझ्या खडू फळा विनंती एकच.....🙏...तुम्ही शाळा सुरु करा। मैदानातली मजा मस्ती बंद झाली सारी शाळेतल्या जेवणाची बातच लय न्यारी पोषण आहार कर्मचार...