कविता :- शाळा सुरू करा ना गुरुजी
विनंती करतो आहे.
बस झालाय आता
या कोरोनाचा चाळा
विनंती एकच गुरुजी...🙏....
तुम्ही सुरू करा शाळा
ऑनलाईन शिक्षण
डोक्यात नाही शिरत
मोबाइलचा अभ्यास काही
मनात नाही भरत
कृतीयुक्त खेळ तुम्ही
आम्हा सोबत खेळा
विनंती एकच.....🙏....तुम्ही शाळा सुरु करा।
मायबाप म्हणती हा
समय आला कैसा
पोट भरण्याइतका बी
जवळ नाही पैसा
रिचार्ज तुझ्यासाठी कोठून मारु बाळा
विनंती एकच.....🙏.....तुम्ही शाळा सुरु करा।
मोबाइल येऊ द्या किती
थ्रिजी किंवा फोरजी
साऱ्या गावाला आता
आठवतात गुरुजी
मार्ग यातून तुम्ही कसातरी काढा
विनंती एकच....🙏....तुम्ही शाळा सुरु करा।
न्यावी लागतात चारायला
रानामाळात ढोरं
गावकरी म्हणती सगळी
बिघडून गेली पोरं
रंग बी माझा पडला आहे काळा
विनंती एकच...🙏.....तुम्ही शाळा सुरु करा।
आनंदाचे दिस होते
गेले सारे सरुन
आठवण होते शाळेची
डोळे येती भरुन
स्वप्नामधी येते रोज माझ्या खडू फळा
विनंती एकच.....🙏...तुम्ही शाळा सुरु करा।
मैदानातली मजा मस्ती
बंद झाली सारी
शाळेतल्या जेवणाची
बातच लय न्यारी
पोषण आहार कर्मचारी लावत होते लळा
विनंती एकच....🙏...तुम्ही शाळा सुरु करा।
खरं सांगू गुरुजी
तुम्ही शाळेत येता जेव्हा
रोमारोमात आनंद
संचारतो तेव्हा
हर्ष वाटते भोवती तुमच्या आम्ही होतो गोळा
विनंती एकच...🙏....तुम्ही शाळा सुरु करा।
काहीतरी करा शाळेत
आम्हा न्या ना
भविष्याची काळजी
आमची तुम्ही घ्या ना
पुढे जाण्याचे स्वप्न झाले चोळामोळा
विनंती एकच.....🙏...तुम्ही शाळा सुरु करा।
हात जोडतो निसर्गाला
थांबव हा खेळ
सुरु होऊ दे शाळा
फक्त एकच वेळ
गुरुजीं सोबत हसू दे पुन्हा खळखळा
विनंती एकच....🙏.....तुम्ही शाळा सुरु करा।
लेखक : अज्ञात
मनोगत :-
प्रिय वाचक,
प्रत्येक देशात शिक्षणाला सर्वोच्च मानले जाते तुम्हाला एक किस्सा सांगतो जपान मधील एका ठिकाणी प्रवासाच्या कमी मुळे रेल्वे गाडी बंद करायचे तिथले सरकारने ठरवले होते पण तिथल्या सरकारला जेव्हा हे कळले की त्या रेल्वेने दररोज एक मुलगी आपल्या शाळेला जाणे-येणे करते . तेव्हापासून तुम्हाला पण अभिमान वाटेल त्या देशाचा. त्या देशाने एका मुलीसाठी ट्रेन तर चालू ठेवलीच पण असा हुकूम पण चालू केला की जोपर्यंत त्या मुलीचे ग्रॅज्युएशन होत नाही तोपर्यंत ट्रेन बंद होणार नाही.
हा लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा...
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶
Koni lihili
ReplyDelete