झोप न येण्याची कारणे व उपाय - आरोग्य /उपाय आणि अपाय
झोप ही आपल्या आरोग्यासाठीची अत्यावश्यक क्रिया आहे; पण कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा अतिरेकही घातकच असतो. झोपेच्या बाबतीतही असेच होते. बर्याच जणांना खूप जास्तवेळ झोपण्याची किंवा खूपच कमी वेळ झोपण्याची सवय असते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. झोपेच्या या समस्या, त्यांची कारणे व त्यांचे दुष्परिणाम याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असणे व त्याबद्दल आपण जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराला व मेंदूलाही विश्रांती मिळावी यासाठी झोप अत्यावश्यक आहे. रात्री पुरेशी झोप झाल्यास शरीर दुसर्या दिवशी काम करण्यासाठी ताजेतवाने होते. याशिवाय आपले हृदय, डोळे यांच्यासहित आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठीही झोप आवश्यक असते. समान्यपणे एका लहान मुलाला 8 ते 10 तासांची झोप आवश्यक असते, तर प्रौढांना 6 ते 7 तासांची झोप पुरेशी असते; पण अलीकडे प्रौढांंमध्ये अतिझोपेचे प्रमाण वाढते आहे. 6 तासांऐवजी 8 ते 10 तास किंवा अनेकजण 11 तासही झोपतात, तर काहीजणांना धड 4 तासांची झोपही मिळत नाही; पण या कमी झोपेचे किंवा अतिझोपेचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात. झोपेच्या योग्य सवयी, वेळ इत्यादी गो