व्यापारी व उंट - बोधकथा
एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावा गावातून तो विकत असे... अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली... रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले... मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो... दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो., एका उंटाला दोरीने बांधतो... मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते., आता काय करावे...? पंचाईत झाली... उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते... व्यापारी परेशान झाला... इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला., ती काही दिसेना... त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे., पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध... महाराज, पण दोरी नाहीये ना... पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर"., त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली... आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला... सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला... झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोड...