कविता :- सावर रे मना
आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2020 ला मराठीचे शिलेदार समूहावर प्रकाशित झालेल्या बेस्ट पाच कविता .... 🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴🔶🔴 • सावर रे मना • सावर रे मना आता तरी होवू नकोस दोलायमान राहशील स्थिरभावाने तू होशील रे मोठा गुणवान ॥ तुझा चंचल स्वभाव जणू वाटे सर्कशीतला जोकर गांभिर्याने वाग जराशी तू चंचलपणाला दे ठोकर ॥ उठसूठ माजले काहूर तुझ्या ठायी विचारचक्राचे सावर रे मना आता तरी बांध घाल तुला संयमाचे ॥ नको होवूस चलबिचल प्रज्ञा तुझी अलौकिकतेची अभ्यासाने सर्व साध्य होई दाखव चुणूक विद्वत्तेची ॥ सावर रे मना आता तरी दु:खे ही पचवायला शिक समतोल ढळू देवू नको ...