Posts

Showing posts with the label जगी सर्व सुखी कोण - बोधकथा

जगी सर्व सुखी कोण - बोधकथा

एका जंगलात एक कावळा रहात होता. आपला दिवस आनंदाने आणि सुखाने घालवत तो आयुष्य काढत होता. आपण अत्यंत सुखी आहोत अस त्याला वाटायचं आणि त्याच आनंदात तो जगत होता. एक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहोत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला," मी असा एकदम काळा कुळकुळीत आणि हा पक्षी एकदम शुभ्र, खरच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा, मी उगाचंच मला सुखी समजत होतो", असा विचार करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या. तो राजहंसही म्हणाला," खरं आहे मित्रा तुझं, मी ही समजत होतो असं. पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं, मला एक रंग आहे पण त्याला दोन रंग होते, खरच तो माझ्यापेक्षा सुखी असणार रे". मग हा कावळा पोपटाच्या शोधात निघाला. एका पोपटाला गाठून त्याने सगळी कथा ऐकवली. तो पोपट हसत म्हणाला," माझा ही समज असाच होता, मी स्वतःला खरच सुखी समजत होतो. पण एके दिवशी मी एका मोराला पाहिलं आणि मला जाणवलं कि तोच सगळ्यात सुखी पक्षी आहे पृथ्वीवर, कारण त्याच्या अंगावर अगणित रंग आहे...