जिवन विचार - 58
जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते. ते पाहून एक कावळा तिला सांगतो की,"तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये." त्यावर चिमणी सुंदर उत्तर देते की,"या जळालेल्या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहीला जाईल, तेव्हा माझे नाव 'आग लावणाऱ्यां'त नव्हे, तर 'आग विझणाऱ्यां'त येईल." ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे, त्या पायरीला कधीच विसरू नये. कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो..