विस्टन चर्चिल - बोधकथा
ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची. लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडफड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झफाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अफरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडच...