विस्टन चर्चिल - बोधकथा

ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची.
लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्‍याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्‍वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडफड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झफाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अफरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’
पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवीप्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा फ्रश्‍न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘ *माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उदगारले- ‘‘ *माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका* ’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी भाषण म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !