कुरतडलेला पेरू - बोधकथा
एक छोटी मुलगी आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभी ! तिची आई हसतहसत म्हणाली,"बेटा एक पेरु मला दे". तेवढ्यात तिने तो पेरू दाताने कुरतडला.तिची आई काहीच बोलली नाही. मुलीने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या मुलीची ही कृती बघून तिची आई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले*. *तेव्हा तिच्या लहानग्या मुलीने चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाली, "आई, हा घे.हा जास्त गोड आहे." आईच्या डोळ्यात पाणी आले. प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही... *एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून* गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते...!! 💐💐