भूतलावरची येती पन्नास वर्षे
५० वर्षांनी काय घडेल, असा प्रश्न विचारला असता अनेकांचे अनेक उत्तरे येतील. सत्ताधारी स्वतःच्या सत्तेवरच्या पुढच्या पिढीबद्दल बोलेल, ज्योतिषी ग्रहांच्या युत्यांची गणिते मांडेल, शेतकरी कमी पडणाऱ्या पाण्याची चिंता करेल, तर सामान्य वाचक नातवाच्या अॅडमिशनची चिंता व्यक्त करेल ! कोणताही शास्त्रज्ञ मात्र या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे बघून नक्कीच विचारात गढून जाईल. त्याची कारणे तशीच आहेत. औद्योगिक प्रगतीचा वेग, त्यातून निर्माण होणारे रासायनिक प्रदूषणाचे प्रश्न, शहरातील बदलती राहणीची पद्धती, शेती, पाणीपुरवठा या विविध बाबींनी या प्रश्नाला इतके गंभीर स्वरूप आले आहे की कोणीही शास्त्रज्ञ या प्रश्नाला लगेच काहीच उत्तर देऊ शकणार नाही. एकमेकांत विचित्रपणे गुंतलेले असंख्य प्रश्न या पन्नास वर्षात काय काय घडणार आहे, याचे ठोक स्वरूप समोर येऊ देत नाहीत. प्रथम सध्याचे भीषण स्वरूपाचे प्रश्न कोणते, याची केवळ यादी बघू या - १. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण. १८५० साली हे प्रमाण २६५ पार्टस पर मिलियन किंवा पीपीएम होते, तर १९८८ साली नासाने केलेल्या मोजणीत ते ३५० पीपीएम इतके वाढले आहे. यामुळे पृथ्वी